नाना साधनें मंत्र तंत्र – संत निळोबाराय अभंग – १०२७
नाना साधनें मंत्र तंत्र
।
उपासना यंत्र अवघड तें ॥१॥
म्हणोनियां हरिचें ।
भाविकां सुगम हरिभक्तां ॥२॥
नाहीं आघात प्रायश्चित ।
वाचा शुचिर्भूत सर्वदा ॥३॥
निळा म्हणे ज्ञान व्युत्पत्ति ।
कळती निगुती योगाचिया ॥४॥