न लगे जागें वनाप्रती ।
अथवा एकांती बैसणें ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा कां वाचे ।
सकळार्थाचें कारण हें ॥२॥
न लगे आसन मुद्रा ।
सांडणें कळा योगस्थिति ॥३॥
निळा म्हणे उधळण सार ।
न लगे निराहार व्रतचर्चा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.