न लगे जागें वनाप्रती – संत निळोबाराय अभंग – १०२६
न लगे जागें वनाप्रती ।
अथवा एकांती बैसणें ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा कां वाचे ।
सकळार्थाचें कारण हें ॥२॥
न लगे आसन मुद्रा ।
सांडणें कळा योगस्थिति ॥३॥
निळा म्हणे उधळण सार ।
न लगे निराहार व्रतचर्चा ॥४॥