नका बोलों शब्द वावगे – संत निळोबाराय अभंग – १०२५

नका बोलों शब्द वावगे – संत निळोबाराय अभंग – १०२५

नका बोलों शब्द वावगे विवाद ।
आठवा गोविंद ध्यानीं मनीं ॥१॥
सकळही तुमचें होईल कल्याण जरी गाल गाणें विठोबाचें ॥२॥
लटिकाचि बडिवार बोलों जाल वाचा ।
तरि होईल काळाचा अति क्रोध ॥३॥
निळा म्हणे पहा विचारुनी दृष्टी ।
धरा पोटीं होईल तें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नका बोलों शब्द वावगे – संत निळोबाराय अभंग – १०२५