न कळेचि प्रेम याची गोडी । धांवे तांतडी नाम घेतां ॥१॥ भरोनियां मन अंतरी राहे परताचि नोहे जवळुनी ॥२॥ न बिसंबे त्या रानीं वनीं । साउली धरुनी चाले सवें ॥३॥ निळा म्हणे पुरवी भुके । वागवी भातुकें खांदयावरी ॥४॥