तरले नामें अनेक तरती – संत निळोबाराय अभंग – १०२१
तरले नामें अनेक तरती ।
वैकुंठा जाती घोषगजरें ॥१॥
ऐसा याचा कीर्तिमहिमा ।
उत्तमा अधमा सारिखाचि ॥२॥
कलियुगीं तो सुगम सार ।
नामोच्चार हरीचा ॥३॥
निळा म्हणे अनुतापेंसी ।
गाती वैंकुठासी ते जाती ॥४॥
तरले नामें अनेक तरती ।
वैकुंठा जाती घोषगजरें ॥१॥
ऐसा याचा कीर्तिमहिमा ।
उत्तमा अधमा सारिखाचि ॥२॥
कलियुगीं तो सुगम सार ।
नामोच्चार हरीचा ॥३॥
निळा म्हणे अनुतापेंसी ।
गाती वैंकुठासी ते जाती ॥४॥