सुनाकुमरी आमुचे – संत निळोबाराय अभंग – १०२
सुनाकुमरी आमुचे घरीं
त्यांतेही चाळवुनियां निर्धारी
लोळे सेजाबाजावरी
आणखीही करी काय नेणों ॥१॥
तया नावडतिचि भ्रतार
सासासासरे भावेदिर
करुनिया यासिची परिचार
रतल्या निरंतर याची संगें ॥२॥
खाता जेवितां स्मरति यातें
लेतां नेसतां यापेंचि चित्तें
कामकाजीं जैसि भ्रमितें
तैसिया उदास वर्तती ॥३॥
यशोदा याणेंचि लाविला चाळा
वेडयाचि केल्या सुनाबाळा
देखता याचिया श्रीमुखकमळा
मग त्या नव्हतचि कोणाच्या ॥४॥
ऐसा चोर हा शिनळ
यशोदे आवरी आपुला बाळ
येणें बुडविलें आमुचे कुळ
न कळे आकळ खेळयाच ॥५॥
सांगता हे ऐशी गोष्टी
क्रोधची उपजे तुझया पोटीं
परीहा भला नव्हेचि शेवटीं
उभ्यकुलां बुडवणा ॥६॥
निळा म्हणे त्यांचि वचनें
ऐकोनि यशोदा क्रोधें म्हणे
काय गे बोल त्या माझें तान्हें
बाळक हें नेणें चोया करुं ॥७॥