जेथूनियां येणेंचि नाहीं – संत निळोबाराय अभंग – १०१९

जेथूनियां येणेंचि नाहीं – संत निळोबाराय अभंग – १०१९

जेथूनियां येणेंचि नाहीं ।
फिरोनियां कांही संसारा ॥१॥
तया नांव परमपद ।
लाभती मृग्ध हरिनामें ॥२॥
पहा नवलाव हा कैसा ।
वानरां रिसां पदप्राप्ति ॥३॥
निळा म्हणे श्रीराम सेवे ।
नामानुभावें मर्कटे ते ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जेथूनियां येणेंचि नाहीं – संत निळोबाराय अभंग – १०१९