जिहीं गाईलें हरिचे नाम । आतळों कर्म नेदी त्यां ॥१॥ जन्म जरा हरुनी व्याधी । बैसवी पदीं अपुलीया ॥२॥ ऐसा अगाध मिहिमा याचा । वर्णितां वाचा न पुरती ॥३॥ निळा म्हणे स्तवितां संतीं । अपार मती वेदांचिये ॥४॥