जिव्हाग्रीं ठेवितांचि गोड । पुरे कोड सकळही ॥१॥ तें या विठोबाचे नाम । सर्वदा निष्काम फळदाते ॥२॥ उच्चारचि करितां ओठीं । जाळित कोटी पापांच्या ॥३॥ निळा म्हणे साधन ऐसें । सुलभचि नसे दुजें आन ॥४॥