जन्म जरा तुटती रोग – संत निळोबाराय अभंग – १०१६

जन्म जरा तुटती रोग – संत निळोबाराय अभंग – १०१६

जन्म जरा तुटती रोग ।
धरितां अनुराग हरिनामींची ॥१॥
ऐसा अनुभव सांगती संत ।
पावले प्रतीत आंगेंचि ते ॥२॥
तरोनि आपण आणिकां तारिती ।
जड जीवा दाविती मार्ग सोपा ॥३॥
निळा म्हणे नाम वरिष्ठ साधना ।
माजीं त्रिभुवना आख्या याची ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जन्म जरा तुटती रोग – संत निळोबाराय अभंग – १०१६