केला प्रतिपक्ष आपुल्या – संत निळोबाराय अभंग – १०१४

केला प्रतिपक्ष आपुल्या – संत निळोबाराय अभंग – १०१४

केला प्रतिपक्ष आपुल्या अभिमानें ।
तोडिली बंधनें बहुतांची ॥१॥
जिही उच्चारिलें अनुतापें नाम ।
त्यांचे जन्ममरण निवारिलें ॥२॥
कोणीये यातीचा हो कां कोणी ।
एका केलें कवतुक त्याचें तुम्ही ॥३॥
निळा म्हणे सजना जातीचा कसाई ।
रंका बंका तोहीं उध्दरिला ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

केला प्रतिपक्ष आपुल्या – संत निळोबाराय अभंग – १०१४