काय करावी तपसाधनें – संत निळोबाराय अभंग -१०१३

काय करावी तपसाधनें – संत निळोबाराय अभंग -१०१३

काय करावी तपसाधनें ।
हरिनाम चिंतनें सर्व सिध्दी ॥१॥
हा गे वाल्‍मीक रामचि झाला ।
प्रल्हादें जिंकीला व्दंव्दसमूह ॥२॥
गजेंद्र पशू नामचि जपतां ।
मुक्ति सायुज्यता भोग भोगी ॥३॥
निळा म्हणे हरिनाम वाड ।
मुक्तिचें सांकड नाहीं आम्हां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

काय करावी तपसाधनें – संत निळोबाराय अभंग -१०१३