काम क्रोध पळती दुरी । माया तृष्णा आपापरी ॥१॥ विठ्ठल नामाचिया गजरें । दोष गेले दिगांतरें ॥२॥ अहं ममता देशघडी । आशा चिंता झाली वेडी ॥३॥ निळा म्हणे ऐसें झालें । हरिच्या नामे हरिचि केलें ॥४॥