कळासलें मनीं । तेंचि उपदेशा तोंची कानीं ॥१॥ भवाब्धी हा तारावया । नाम तुमचें पंढरिराया ॥२॥ आपणा आणि आणिकां । आड येऊं नेदूं शंका ॥३॥ निळा म्हणे जीवेंसाठीं । करितो करुनियां आटी ॥४॥