एकोनियां हरिनाम घोष । पळती दोष दिगंता ॥१॥ जेंचि हनुमंताचिये हांके । कांपती धाकें निशाचरें ॥२॥ अथवा पडतांचि रविकिरण । जाय हरपोन अंधकार ॥३॥ निळा म्हणे घोकिलें जिहीं । घेतला तिहीं अनुभव हा ॥४॥