एकोनियां हरिनाम घोष – संत निळोबाराय अभंग – १०१०
एकोनियां हरिनाम घोष ।
पळती दोष दिगंता ॥१॥
जेंचि हनुमंताचिये हांके ।
कांपती धाकें निशाचरें ॥२॥
अथवा पडतांचि रविकिरण ।
जाय हरपोन अंधकार ॥३॥
निळा म्हणे घोकिलें जिहीं ।
घेतला तिहीं अनुभव हा ॥४॥
एकोनियां हरिनाम घोष ।
पळती दोष दिगंता ॥१॥
जेंचि हनुमंताचिये हांके ।
कांपती धाकें निशाचरें ॥२॥
अथवा पडतांचि रविकिरण ।
जाय हरपोन अंधकार ॥३॥
निळा म्हणे घोकिलें जिहीं ।
घेतला तिहीं अनुभव हा ॥४॥