एका हरिच्या नामाचिसाठीं । चढला वैकुंठीं गजेद्र पशु ॥१॥ व्दंव्दाचिया महामारी । ओढितां जळचरीं जळा आंत ॥२॥ तैसाचि प्रल्हाद नामचि गातां । शस्त्र अग्नी घाता विष न करी ॥३॥ निळा म्हणे हरिचे भक्त । हरिनामें मुक्त बहुत झाले ॥४॥