एकचि नाम विठोबाचें । उच्चारितां वाचे उणें काय ॥१॥ रिध्दी सिध्दी लोटांगणीं । येती धांवोनि चोजवीत ॥२॥ भुक्ति मुक्ति जवळूनियां । नवजाती ठाया आन कोठें ॥३॥ निळा म्हणे सर्वही सुखें । वसती हरिखें जवळी त्या ॥४॥