एक गांऊ आम्ही विठोबाचें नाम । सकळहि धाम मंगळाचें ॥१॥ इतर साधनें फळ काम देती । पुनरपी आणिती गर्भवसा ॥२॥ योग याग स्वर्ग काम फळदाते । म्हणोनियां त्यातें दूषिती संत ॥३॥ निळा म्हणे नाहीं विकार हरिनामा । पाववी निजधामा स्वस्ति क्षेम ॥४॥