उपदेशिला एकचि सार । मजही उच्चार नामाचा ॥१॥ म्हणती न पडे साधन फंदीं । होशिल दोंदी काळाचा ॥२॥ करीं संत समागम । गाईं हरिनाम कीर्तनीं ॥३॥ निळा म्हणे ऐसा संतीं । केला निज प्रीति उपदेश ॥४॥