उपदेशिला एकचि सार – संत निळोबाराय अभंग – १००५
उपदेशिला एकचि सार ।
मजही उच्चार नामाचा ॥१॥
म्हणती न पडे साधन फंदीं ।
होशिल दोंदी काळाचा ॥२॥
करीं संत समागम ।
गाईं हरिनाम कीर्तनीं ॥३॥
निळा म्हणे ऐसा संतीं ।
केला निज प्रीति उपदेश ॥४॥
उपदेशिला एकचि सार ।
मजही उच्चार नामाचा ॥१॥
म्हणती न पडे साधन फंदीं ।
होशिल दोंदी काळाचा ॥२॥
करीं संत समागम ।
गाईं हरिनाम कीर्तनीं ॥३॥
निळा म्हणे ऐसा संतीं ।
केला निज प्रीति उपदेश ॥४॥