उच्चारितां नाम वाचे । झालें त्याचें स्वरुपचि ॥१॥ नाहीं तया उरले दुजें । आत्मतेजें जग भासे ॥२॥ ब्रम्हानंदी निमग्न वृत्ति । विराजती स्वानंदे ॥३॥ निळा म्हणे गुणातीत । अखंडित निजबोधें ॥४॥