उच्चारितां नाम वाचे – संत निळोबाराय अभंग – १००४
उच्चारितां नाम वाचे ।
झालें त्याचें स्वरुपचि ॥१॥
नाहीं तया उरले दुजें ।
आत्मतेजें जग भासे ॥२॥
ब्रम्हानंदी निमग्न वृत्ति ।
विराजती स्वानंदे ॥३॥
निळा म्हणे गुणातीत ।
अखंडित निजबोधें ॥४॥
उच्चारितां नाम वाचे ।
झालें त्याचें स्वरुपचि ॥१॥
नाहीं तया उरले दुजें ।
आत्मतेजें जग भासे ॥२॥
ब्रम्हानंदी निमग्न वृत्ति ।
विराजती स्वानंदे ॥३॥
निळा म्हणे गुणातीत ।
अखंडित निजबोधें ॥४॥