अखंड भूतदया मानसीं ।
वाचे नाम अहर्निशी ।
तया न बिसबे हषिकेशी ।
मागें मागें हिंडतसे ॥१॥
जिहीं परकारणीं वेंचिलें ।
शरीर आयुष्य आपुलें ।
धन वित्तही वंचिले ।
तयां विठठलें सन्मानिजे ॥२॥
जिहीं गाईलें नित्य नाम ।
अंतरीं धरुनियां प्रेम ।
तया वस्तिसी निजधाम ।
निर्मूनियां ठेविलें ॥३॥
जिहीं धरिला संतसंग ।
दुराविलें त्रिविध जग ।
तया सखा पांडुरंग ।
निजानुभवें जोडला ॥४॥
निळा म्हणे सद्गुरु भक्ति ।
दास्य ब्राम्हणांचे अनुरक्ती ।
तयालागीं हा श्रीपती ।
करी सांगाती आपुला ॥५॥