येरें शब्द ते – संत निळोबाराय अभंग – १००

येरें शब्द ते – संत निळोबाराय अभंग – १००


येरें शब्द ते ऐकोन
उभा ठाकला जगज्जीवन
माता म्हणे हे अवगुण
कांरे ऐसे करितोसी ॥१॥
ठायीं वाडिलिया न जेविसी
आणि येथें माती खाशी
येरु म्हणे नाहीं ऐशी
प्रतिज्ञा मी दावीन ॥२॥
तंव ते म्हणे दावीं मुख
येरु म्हणे तरी हें देख
पाहे तंव माजीं त्रैलोकय
चंद्रसूर्य तारांगणें ॥३॥
मेरुकुळाचाळ पर्वत
नदादि नदीयांचे ओघ वहात
सप्तहि सागर भरतें येत
ऐसें देखत वदनामाजीं ॥४॥
भोवंडी आली पहातां नयनां
मग म्हणे निमटी निमटी आतां वदना
माव तुझी जगज्जीवना
नकळेचि आम्हां प्राकृतां ॥५॥
मग धरुनियां तो करतळीं आलिंगिला हदयमेळीं
विस्मयें दाटोनियां वेल्हाळी
आली घेउनी मंदिरां ॥६॥
निळा म्हणे सांगे लोकां
अपूर्व देखिलें म्यां कौतुका
मृत्तिकामिसें माजी त्रैलोक्या
पाहिलें वदनीं हरिचिया ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

येरें शब्द ते – संत निळोबाराय अभंग – १००