येरे दिवशीं घेउनी सवें
गोवळ खिल्लारांचे थवे यमुनातटाकीं नित्य नवे
खेळ खेळती विचित्र ॥१॥
म्हणे यारे चेंडूफळी
खेळों अवघे मिळोनी बळी
ऐसें बालोनियां वनमाळीं
कास घालित नेटकी ॥२॥ चें
डू घेऊनियां श्रीहरी
हाणे डाव मागें वरी
कानपिळा मग ते सारी
पाठीवरी बैसोनी ॥३॥
न सोडिचि पायातळीं येतां
मग तो हो कां कोणीहि भलता
म्हणे विचारुनियां तत्वत्तां
खेळा खेळ अवघेही ॥४॥
चिंतूनियां बरव्यापरी
चेंडू टाकिला कंळबावरी
अडकलासा देखोनी हरी
अभ्यंतरीं संतोषला ॥५॥
होतें आघींचि आर्त मनीं
काळया आणावा नाथुनी
मग म्हणे म्हणती गडे
डोहो तळीं वृक्षही अवघड
न धरीं कृष्णा याची चाड
करुं दुसरा नवा घरीं ॥७॥