संत निळोबा महाराज

आळंदीची व पंढरीची तुलना – संत निळोबाराय

संत निळोबाराय – आळंदीची व पंढरीची तुलना

४६८

एक भूवैकुंठ एक शिवपीठ । महिमा वरिष्ठ दोहींचा ॥१॥

तेथें पेरिलें नुगवे शेतीं । अस्थी विरती तेथें उदकीं ॥२॥

चंद्रभागा चक्रतीर्थ । भीमा समर्थ इंद्रायणी ॥३॥

निळा म्हणे तेथें हनुमंत । येथें अश्वत्थ कनकाचा ॥४॥

४६९

पंढरपुरीं ज्ञानेश्वरीं । मुक्ति कामारी वोळंगती ॥१॥

तेथें देव येथें भक्त । महिमा अदभुत दोहींचा ॥२॥

तेथें ध्यान येथें ज्ञान । परलोक साधन दो ठायीं ॥३॥

निळा म्हणे तेथें गुरुड । येथे झाड अजानतरु ॥४॥

४७०

यात्रे अलंकापुरा येती । ते ते आवडती विठठला ॥१॥

पांडुरंगे प्रसन्नपणें । केलें देणें हे ज्ञाना ॥२॥

भूवैकुंठ पंढरपूर । त्याहुनी थोर महिमा या ॥३॥

निळा म्हणे जाणोनी संत । येती धांवत प्रतिवर्षी ॥४॥

४७१

वर्णितां महिमा तो अगाध । जेथें सिध्द अवतरले ॥१॥

पशुमुखें वदवूनि श्रुती । निर्जीव भिंती चालविली ॥२॥

सन्मुख पुढें अजानवृक्ष । पिंपळ प्रत्यक्ष सोन्याचा ॥३॥

निळा म्हणे ऐकोनी कीर्ती । चांगदेव येती दर्शना ॥४॥

४७२

उभारिला ध्वज तिहीं लोकांवरी । ऐशी चराचरी कीर्ति ज्याची ॥१॥

ते हे निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ॥२॥

धरुनि सगुण रुपें केली क्रीडा । बोलविला रेडा निगम वावे ॥३॥

बैसूनियां वरी चालविली भिंती । चांगदेवा प्रती दिली भेटी ॥४॥

मग वास केला अळंकापुरासी । पिंपळ व्दारासी कनकाचा ॥५॥

निळा म्हणे ज्याच्या नामें करितां घोष । नातळती दोष कळिकाळाचे ॥६॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav | आळंदीची व पंढरीची तुलना |

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .