संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

संत निळोबाराय (संतांपाशीं करुणा भाकणें)

संत निळोबाराय (संतांपाशीं करुणा भाकणें)

१४४२

तुमच्या पायीं ठेविलें मन । एवढेंचि धन मजपाशीं ॥१॥

जरी हा देव दाखवाल । अभय दयाल वचनाचें ॥२॥

तरी हा प्राण ओंवाळीन । जीवें चरण न सोडीं ॥३॥

निळा म्हणे कृपा करा । यावरी धरा मजहातीं ॥४॥

१४४३

तुम्ही संत दयाघन । आम्हां म्हणऊन विनवितों ॥१॥

सलगी केंली पायांपाशीं । करा अपराधासी क्षमा त्या ॥२॥

मी तों नेणतेंचि अपत्य । तुम्ही संत मायबाप ॥३॥

निळा म्हणे बोबडे बोल । बोलेन शिकवाल तुम्ही ते ॥४॥

१४४४

मज तों माझें न कळोचि हित । पतिता पतित आगळा ॥१॥

परी तुम्हीं लाविले कांसे । उतरा जैसें उतराल ॥२॥

कर्महीन मतिहीन । न कळेचि ज्ञान विहिताचें ॥३॥

निळा म्हणे धरिलें हातीं । हेचि निश्चिती मानियेली ॥४॥

१४४५

विनंती माझी एकीं ऐका । अहो पुंडलिका महामुनी ॥१॥

ठाव दयावा चरणांपाशीं । मज विठोबासी विनवुनी ॥२॥

अंगिकारा रंका दीना । विज्ञापना हे माझी ॥३॥

निळा म्हणे सांभाळावें । मज हें दयावें वरदान ॥४॥

१४४६

सर्वकाळ खंती वाटे । कैं तो भेटे मज आतां ॥१॥

न लोटे पळ युगा ऐसें । रात्री दिवसें सम झालीं ॥२॥

करुणामुखें भाकी कींव । ये वो ये वो म्हणउनी ॥३॥

निळा म्हणे जाणवा मात । तुम्ही संत एकांती ॥४॥

१४४७

निरवूनियां विठ्ठल  देवा । हातीं धरावा मज आतां ॥१॥

तुमचिया भिडा अंगिकार । करील साचार तत्क्ष्णी ॥२॥

जरी मी अन्यायी अपराधी । तरी कृपानिधी तुम्ही संत ॥३॥

निळा म्हणे विनऊं काय । तुम्ही मायबाप अपत्य मी ॥४॥

१४४८

अंतरींचे मनोगत । तुम्ही तों सतत जाणतसां ॥१॥

तरी वियोग नका आतां । तुमच्या भजना भजनासी ॥२॥

आठव करितां दिवसरात्री । उल्हास चित्तीं मना दयावा ॥३॥

निळा म्हणे कृपाघना । विज्ञापना हे माझी ॥४॥

१४४९

एवढा मनींचा पुरवा हेत । पंढरीनाळा भेटवा ॥१॥

मग मी तुमच्या न सोडीं पायां । करीन काया कुरवंडी ॥२॥

कृपासिंधु तुम्ही संत । पुरवा आर्त हें माझें ॥३॥

निळा म्हणे झालों दास । नका उदास धरुं आतां ॥४॥

१४५०

भेटवाल पंढरीनाथ । तुम्हीचि संत कृपाळु ॥१॥

म्हणोनि येतों काकुळती । पुढतोंपुढती कींव भाकीं ॥२॥

इतरांची मी न करीं आस । झालों दास तुमचाची ॥३॥

निळा म्हणे ठेवा पायीं । यावरी कायी विनवूं मी ॥४॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav |देवभक्त यांची एकरुपता संत निळोबाराय (संतांपाशीं करुणा भाकणें)

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *