वदवी असत्याची वाणी । माजी निंदेची पुरवणी ॥१॥ जळो जळो त्याचें तोंड । पचतें पापाचेंचि कुंड ॥२॥ कुश्चळ सर्वदा अंतरीं । इतरांचिया घातावरी ॥३॥ निळा म्हणे भोगील पीडा । नर्कवासीं होउनी किडा ॥४॥