न पडे विसर याचा मना – संत निळोबाराय अभंग – ७९५

न पडे विसर याचा मना – संत निळोबाराय अभंग – ७९५


न पडे विसर याचा मना ।
झाली तद्रुप वासना ।
मही व्यापूनियां गगना ।
दिसे नयना रुप पुढें ॥१॥
जें जें आढळें दृष्टीपुढें ।
तें तें याच्या स्वरुपें मांडें ।
व्यापुनी सकळांमाजिवडें ।
वसें अंतरीं सकळांचे ॥२॥
स्वरुप सांवळें सगुण ।
अंगकांति मेघवर्ण ।
करीं धरुनियां जघन ।
दृष्टी अवलोकीं पुंडलिका ॥३॥
कर्णी कुंडलें विशाळ डोळें ।
जैसीं विकासलीं दिव्य कमळें ।
हदयावरीं कंठमाळे ।
पदकीं रत्नें झळकती ॥४॥
कास पितांबरें घातलीं ।
मेखळा कटीं सूत्रें रेखिलीं ।
पाउलें विटेवरीं शोभलीं ।
निळयां झालीं प्रसन्न तीं ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

न पडे विसर याचा मना – संत निळोबाराय अभंग – ७९५