संत नरहरी सोनार अभंग

सिक्का जयाचा आहे थोर – संत नरहरी सोनार अभंग

सिक्का जयाचा आहे थोर – संत नरहरी सोनार अभंग


सिक्का जयाचा आहे थोर ।
हातीं पताकांचा भार ॥ १ ॥
भजन होय स्थळोस्थळीं ।
अवघी संत हे मंडळी ॥ २ ॥
वैकुंठीची खूण ।
रणखांब आहे जाण ॥ ३ ॥
खांबासी भेटती जन ।
शिळेवरी लोळे जाण ॥ ४ ॥
पापतापही जळाले ।
संतचरणीं नरहरी लोळे ॥ ५ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.
play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *