शरीराची होय माती – संत नरहरी सोनार अभंग
शरीराची होय माती ।
कोणी न येती सांगाती ॥ १ ॥
सारी अवघीं कामें खोटी ।
अंतीं जाणें मसणवटी ॥ २ ॥
गोत घरें टाकुन सारी ।
शेवटीं गांवाचे बाहेरी ॥ ३ ॥
स्वजन आणि गणगोत ।
उपाय नाहीं हो चालत ॥ ४ ॥
ऐसें स्वप्नवत असार ।
नरहरी जोडितसे कर ॥ ५ ॥
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.