सत्य ज्योतिलिंग बारा ।
प्रातःकाळीं स्मरण करा ।
कोटि कुळें उद्धारा ।
भव तरा बापहो ॥ १ ॥
वाराणसी विश्वनाथ ।
मोक्षदाता तो समर्थ ।
पुरवील अंतरीचें आर्त सोमनाथ ।
सोरटी ॥ २ ॥
ॐकार ममलेश्वर ।
सेतबंध रामेश्वर ।
भीम उगमीं भीमाशंकर ।
घृणेश्वर वेराळीं ॥ ३ ॥
नागनाथ अमृतोदकीं ।
विश्वजन केलें सुखी ।
परळी वैजनाथ सुखी ।
सुकृत साचें जन्माचें ॥ ४ ॥
त्र्यंबक हा तीर्थराज ।
पुरवील अंतरीचें काज ।
त्याही तेजामाजीं तेज ।
महाकाळ उज्जनी ॥ ५ ॥
दुजे कैलास भुवन ।
श्रीशैल्य मल्लकार्जुन ।
वाचे स्मरतां धन्य धन्य ।
अनुपम्य क्षेत्र तें ॥ ६ ॥
ब्रद्रिकेदार उत्तरें ।
ज्याचें स्मरणें भव हा तरे ।
ध्यान धरितां वृत्ति नुरे ।
निज निश्चळ दासाची ॥ ७ ॥
नरहरी म्हणे जन्मा यावे ।
शुद्ध सत्य प्रेम
संत नरहरी सोनार अभंग समाप्त