सकळ धर्माचें कारण – संत नरहरी सोनार अभंग

सकळ धर्माचें कारण – संत नरहरी सोनार अभंग


सकळ धर्माचें कारण ।
नामस्मरण हरिकीर्तन ॥ १ ॥
दया क्षमा समाधान ।
घ्यावे संतांचें दर्शन ॥ २ ॥
संत संग वेगीं ।
वृत्ति जडों पांडुरंगीं ॥ ३ ॥
नरतनु येयाची बा कदां ।
भावें भजा संत पदा ॥ ४ ॥
भुलूं नका या संसारीं ।
हरी उच्चारी उच्चारी ॥ ५ ॥
सर्व जायाचें जायाचें ।
हरि नाम हेंचि साचें ॥ ६ ॥
विठोबा रक्षिल शेवटीं ।
उभा कर दोन्ही कटीं ॥ ७ ॥
नरहरी जाणूनि शेवटीं ।
संतचरणा घाली मिठी ॥ ८ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.