प्रेम शांति दया शरण निर्धारेसी ।
बसले उदासी सर्व काळ ॥ १ ॥
काया वाचा मन निवडूनी प्राण ।
गुह्य ज्ञान पूर्ण सर्व साक्षी ॥ २ ॥
सद्गुरूची कृपा होय जयावरी ।
तो हा श्रीहरीचा संत झाला ॥ ३ ॥
संत साधुजन वंदुनियां पूर्ण ।
वचे नारायण नाम घेतो ॥ ४ ॥
नरहरी सोनार म्हणे हरिचा दास ।
भावें रात्रंदिवस नाम घेतो ॥ ५ ॥
View Comments
अर्थ