संत नरहरी सोनार अभंग

प्रारब्धाची गति – संत नरहरी सोनार अभंग

प्रारब्धाची गति – संत नरहरी सोनार अभंग


प्रारब्धाची गति ।
कदाकाळीं न सोडिती ॥ १ ॥
होणार सोडिना ।
आलें कपाळी टळेना ॥ २ ॥
दैवयोगाची गती ।
जी होणार ती होती ॥ ३ ॥
जें जें कर्माचें फळ ।
तें तें भोगावें सकळ ॥ ४ ॥
ज्याचें बीज पेरियेलें ।
त्याचें त्यास फळ आलें ॥ ५ ॥
ज्यानें जैसें आचरिलें ।
तैसें त्याच्या फळा आलें ॥ ६ ॥
मानवाचें कल्पना बळ ।
देव करितों सकळ ॥ ७ ॥
किल्ली कैसी चालविली ।
घडामोडी कैसी केली ॥ ८ ॥
सत्य सार बुडविलें ।
अवघे असत्यचि झालें ॥ ९ ॥
नरहरी म्हणे नाम थोर ।
नाम साराहुनी सार ॥ १० ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.
play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *