पहा दिसतो पदार्थ । अवघा नाशिवंत व्यर्थ ॥ १ ॥ माया बहुरूपी नटली । नवखंडी प्रगटली ॥ २ ॥ प्रपंच हें माया जाळ । घातलें भ्रांतीचें पडळ ॥ ३ ॥ उमज पडेना हो कांहीं । मस्तक सद्गुरूचे पायीं ॥ ४ ॥ सद्गुरुनाम हें अमृत । नरहरी जपे ह्रदयांत ॥ ५ ॥