नाम हे नगरी वैकुंठ पंढरी ।
नांदता श्रीहरी पांडुरंग ॥ १ ॥
नरदेहीं जन्मले पंढरीस गेले ।
दृष्टीभरि पाहिले पांडुरंग ॥ २ ॥
भीवरेचें स्नान देवाचें दर्शन ।
पाप हे जळोन जाय तेथें ॥ ३ ॥
चरणावरी माथा नरहरी ठेविला ।
ह्रदयीं बिंबला पांडुरंग ॥ ४ ॥
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.