कृपा करी पंढरीनाथा – संत नरहरी सोनार अभंग
कृपा करी पंढरीनाथा ।
दीनानाथ तूं समर्था ॥ १ ॥
अपराध करीं क्षमा ।
तुझा न कळे महिमा ॥ २ ॥
करीं भक्ताचा सांभाळु ।
अनाथाचा तूं कृपाळु ॥ ३ ॥
आम्ही बहुत अन्यायी ।
क्षमा करी विठाबाई ॥ ४ ॥
आलों पतीत शरण ।
पावन करीं नारायण ॥ ५ ॥
पापी अमंगळ थोर ।
कृपा करीं दासावर ॥ ६ ॥
मी तरी अवगुण बहुत ।
दयाकरीं पंढरीनाथ ॥ ७ ॥
दयासागरा अनंता ।
कृपा करीं पंढरिनाथा ॥ ८ ॥
तुझें नामामृत सार ।
नरहरि जपे निरंतर ॥ ९ ॥
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.