जग हें अवघें सारें ब्रह्मरूप ।
सर्वांभूतीं एक पांडुरंग ॥ १ ॥
अणुरेणू पर्यंत ब्रह्म भरीयेलें ।
सर्वांघटीं राहिलें अखंडित ॥ २ ॥
विश्व हें व्यापिलें भरूनी उरलें ।
कवतुक दाविलें मायाजाळ ॥ ३ ॥
भ्रांती मायाजाळ काढता तात्काळ ।
परब्रह्मीं खेळे अखंडित ॥ ४ ॥
अखंडित वस्तु ह्रदयीं बिंबली ।
गुरुकृपें पाहीं नरहरी ॥ ५ ॥