भस्म उटी रुंडमाळा – संत नरहरी सोनार अभंग
भस्म उटी रुंडमाळा ।
हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥
गज चर्म व्याघ्रांबर ।
कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥
भूतें वेताळ नाचती ।
हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥
सर्व सुखाचें आगर ।
म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.