अभंग गाथा

संत नामदेव गाथा शिवरात्रमाहात्म्य

संत नामदेव गाथा शिवरात्रमाहात्म्य अभंग १ ते ५५

१.
कैलासींचा देव भोळा चक्रवर्ती । पार्वतीचा पति योगिराज ॥१॥
तयाचिया पाया माझे दंडवत । घडो आणि प्रीत जडो नामीं ॥२॥
जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळीं । तिजा नेत्रज्वाळी जात वेद ॥३॥
कंठीं काळकूट डौर त्रिशूल हातीं । सर्वांगीं विभूति शोभतसे ॥४॥
गळां रुंडमाळा खापर हस्तकीं । रामनाम मुखीं सर्व-काळ ॥५॥
व्याघ्रचर्मधारी स्मशानीं राहिला । संगें भूतमेळा बिरा-जित ॥६॥
नामा ह्मणे नामें नासोनियां पाप । करीं मुखरूप भक्तांलागीं ॥७॥

२.
डवरला गिरी कैलास ढवळा । सिंहासन ज्याला ढव-ळेची ॥१॥
पाहतां पाहतां निवाले लोचन । भव्य ज्याचें ध्यान एक-रूप ॥२॥
ढवळा सर्वांगीं देव तो आपण । लेइला भूषण तेंहि तैसें ॥३॥
पर्वताची बाळ पार्वती ढवळी । अर्धांगीं शोभली एकरूप ॥४॥
स-र्वांगीं लविली ढवळी विभूती । माळा विराजती स्फटिकाच्या ॥५॥
पांढरिया जटेमध्यें गंगा आहे श्वेत । गळ्यांत सोभत श्वेत सर्प ॥६॥
शंखपाळ श्रवणें कुंडलें ढवळीं । देखतां भूतळीं दुजा नाहीं ॥७॥
नामा ह्मणे ऐसें दाऊनियां ध्यान । भाविकाचें मन तोषवित ॥८॥

३.
एके दिनीं रत्नसिंहासनावरी । कैसा त्रिपुरारी शोभ-तसे ॥१॥
सांगों जातां चार्‍ही वाचा विसांवती । तेथें माझी मति काय सांगों ॥२॥
वामभागीं साजे सुंदरी भवानी । सिद्ध ऋषि मुनि करिती सेवा ॥३॥
नारद तुंबर गर्जती गायन । तेथें कर जोडोन उभे देव ॥४॥
गणेश शण्मुख ढाळिती चामरें । रिद्धिसिद्धि द्वार राखिताती ॥५॥
नामा चा गजर मृदंगाची घाई । पाहाती नवाई ब्रह्मादिक ॥६॥
नामा म्हणे करीं देतसे विडिया । लागोनियां पायां वारंवार ॥७॥

४.
तेव्हां प्रश्र करी पार्वती आदरें । शिवाप्रती कर जो-डोनियां ॥१॥
सांगावाजी स्वामि ऐसा इतिहास । गातां जोडे वास तुझे पायीं ॥२॥
जाळोनियां पापें सुखाची उन्नती । विश्व सुखी होती जेणें योगें ॥३॥
नामा ह्मणे सुटे काळासी दरारा । विश्वासिया नरा मुक्ति जोडे ॥४॥

५.
ऐकोनियां वाणी । संतोषला शूळपाणी ॥१॥
देवी चांगलें पुसिलें । तुझ्या बोलें चित्त धालें ॥२॥
बोल नव्हती साचार । जड जीवाचा उद्धार ॥३॥
बोल तुझे गोडावले । जगीं सुदिन पाहिजे ॥४॥
शिवरात्रीचें महिमान । नामा ह्मणे ऐका जन ॥५॥

६.
ऐका सावधान कथा शिवरात्र । पावन पवित्र तिहीं लोकीं ॥१॥
भाव धरोनियां आचरती जरी । वास शिवपुरीं घडे त्यासी ॥२॥
उपवास आणि शिवाचें पूजन । रात्रीं जागरण विधि त्याचा ॥३॥
एक पसा पाणी एक बिल्वदळ । पूजन केवळ सोपें बहु ॥४॥
नामा ह्मेण करा नामाचा गजर । मुखीं हरहर शब्दमात्रें ॥५॥

७.
शिव ऐसा शब्द कल्याणदायक । जाणती भाविक साधुजन ॥१॥
तारक हें नाम भोळ्याभाविकांसी । नेणते जाणत्यांसी लाभ एक ॥२॥
उपमन्यु बाळक दूध मागों गेला । क्षीरांब्धि दिधला उचितासी ॥३॥
दुष्टदुराचारी पतित तारिले । नाही आव्हेरिलें दीनानाथें ॥४॥
नामा ह्मणे शिव विष्णु एकरूप । ताराया अमूप अवतार ॥५॥

८.
भेदवादी जन वदतसे भिन्न । नव्हे तें लक्षण भज-नाचें ॥१॥
विश्वीं विश्वंभर कोंदलासे एक । भेदाचें कौतुक कैसें सांगा ॥२॥
ब्रह्मीं नाहीं ठाव एकपणाचाही । तेथें दुजें कांहीं समावतें ॥३॥
आदि मध्यें अंतीं खेळूनियां खेळ । उरलें तें निखळ अविनाश ॥४॥
हेमीं जैसे केले तैसे होती नग । तरी ते अव्यंग सोनेपणीं ॥५॥
केली जैसी भक्ति शैव कां वैष्णव । पाहतां तो देव नाहीं दुजा ॥६॥
शिवविष्णु दोघे एकचि अवतार । वेदांनीं निर्धार हाचि केला ॥७॥
नामा ह्मणे येथें दुजा नको भाव । विष्णु तोचि शिव शिव विष्णु ॥८॥

९.
कांचीपुरीं राजा नामें सोमदत्ती । तयाचे संपत्ती पार नाहीं ॥१॥
पूर्वपुण्यबळें लाधलें तयासी । देतां उपमेसी उणा शक्र ॥२॥
पांचशतें तया कामिनी सुंदरा । करितां नाहीं पुरा झाला काम ॥३॥
रिद्धि सिद्धि घरीं कामारि हिंडती । धैर्य शौर्य कीर्ति ज्याची जगीं ॥४॥
नामा म्हणे जेथें उणें कांही नाहीं । ऐसें असो-निही न सुटे भोग ॥५॥

१०.
भोगाची नव्हाळी न सुटे कोणे काळीं । वासना वोंगळी तेचि करी ॥१॥
वासनेचि थोरी सांगवेना कांहीं । न सुटिजे कांहीं कोण्या काळीं ॥२॥
तारुण्याच्या भरें आवडी स्त्रियेची । वृद्धपण तेंचि पुढें होय ॥३॥
ह्मणतसे पोरें वांचतील कैसीं । हाचि अह-निंशी ध्यास करी ॥४॥
मेलियाही पुढें तेंचि उभें राहे । जन्मोजन्मीं पाहे लागलेंसे ॥५॥
मृगाचिया ध्यासें भरतां मृगपण । जन्मल्यावां-चून सोडीनातें ॥६॥
नामा ह्मणे जया जैसी जे वासना । जन्मकर्में जाणी जैसीं होतीं ॥७॥

११.
पंचशतामाजी दोघी पतिव्रता । जारणी सर्वथा सर्व कांहीं ॥१॥
करुनियां ऐसीं जाती नरकासी । नांडिलें पतीसी त्यांच्या पापें ॥२॥
करिती एक वेळ झांकिती लोचन । शेवटीं बंधन यमाहातीं ॥३॥
नामा ह्मणे बरें नव्हे हे कोणासी । घडेल तयासी जाच बहू ॥४॥

१२.
राष्ट्रं करी पाप राजानें भोगावें । राजियाचें तें सर्व पुरोहितां ॥१॥
बोले धर्मशास्त्र जाणती सर्वही । परी तें को-णाही न कळे वर्म ॥२॥
शिष्यें केलें पाप भोगावें गुरूनें । स्त्रिनें केलें घेणें पुरुषासी ॥३॥
नामा ह्मणे जन मायेंत गुंतले । सेखी खाती झोले संसाराचे ॥४॥

१३.
ऐसें बहुत काळ लोटलियावरी । पुण्याची सामोग्रीं हारपली ॥१॥
मरोनियां जन्म हरणाचा पावला । पतिव्रता झाल्या कुरंगिणी ॥२॥
प्रारब्धाचा भोग सुटेना कोणासी । केलीं जैसीं तैसीं घ्यावीं फळें ॥३॥
नामा म्हणे देव कृपा करील जरी । सुटेना तोंवरी भोग खरा ॥४॥

१४.
होऊनि हरण राहिला ते वनीं । दोघी त्या हरिणी स्रिया झाल्या ॥१॥
जातीच्या स्वभावें करिती विहार । चित्त झालें स्थिर एकमेकां ॥२॥
धाकुटीला दोन्ही पाडसें गोजिरीं । दुजी गरोदरी पूर्ण मास ॥३॥
नामा म्हणे पुढें काय झाली गती । कथेची संगति ऐका बरी ॥४॥

१५.
देवलोकीं इंद्र शेवेसी सादर । भूतसेन चाकर होता तेथें ॥१॥
सेवेसी चुकतां होय तूं किरात । ऐसें इंद्रें त्यातें शापियेलें ॥२॥
शेज सज्ज करितां अंतर पाडिलें । ह्मणोनी घडले भोग त्यासी ॥३॥
नामा ह्मणे सेवा करणें हें कठीण । त्यानें व्हावें जाण सावधान ॥४॥

१६.
ऐकतांचि शब्द होऊनि किरात । राहिला निवांत एके ग्रामीं ॥१॥
पाळणपोषण विषयांची वोढी । करीतसे जोडी पात-काची ॥२॥
चण्ड भिल्लनाम घेतलें ठेऊनि । दुष्टभाव मनीं वाढ-विला ॥३॥
कासेसीं वाधुरा हातीं शूळं दंड । सामोग्री उदंड मेळविली ॥४॥
हिंदे नान वन पर्वत शिखरें । मारीतसे फार जीवजंतू ॥५॥
जातीचा स्वभाव लागला तयासी । कष्टे अहर्निशीं ह्मणे नामा ॥६॥

१७.
ऐसें असतां तो सरूम आला काळ । प्रारब्धाचें बळ कैसें पाहा ॥१॥
हिंडता हिंडता फार कष्टि झाला । दृष्टिस तयाला न पडे कांहीं ॥२॥
कडे दरी मोठया पर्वताचे वरी । रिघोनियां करी नाना युक्ती ॥३॥
झाली सांजवेळ न मिळे आमीष । होऊनि उदास राहिलासे ॥४॥
नाना ह्मणे मग काय त्यानें केलें । ऐकावें निश्चळें साधूजनीं ॥५॥

१८.
मार्गही राहिला जाऊं कोणीकडे । आमीष न जोडे काय कीजे ॥१॥
चिंताज्वरें फार तापलें अंतर । क्षुघेचा आडदर पोटामध्यें ॥२॥
रिक्त जाऊं तरी नाहीं कांहीं घरीं । वाट पाहे घरीं दारा-पुत्र ॥३॥
पाहूम जातां काहीं नाठवे विचार । तेणें स्थिरस्थिर पाय टाकी ॥४॥
नामा ह्मणे तेव्हां देखे सरोबर । कांहींसा विचार करूं लागे ॥५॥

१९.
भोंवतालें जाळें घाली नेटेंपाटें । हस्तकीं तिखट बाण धरी ॥१॥
येतील उदकपानासी सावजें । पाहे त्याचे व्याजें रोखोनियां ॥२॥
तेथें एक बिल्ववृक्ष महाथोर । वेंघोनियां वर बैसलासे ॥३॥
डोळ्याआड आलीं ह्मणोनियां तोडी । अंतरीं आवडी आमीषाची ॥४॥
बकाचियेपरी ध्यानस्थ राहिला । जीविंचा जिव्हाळा वेगळाची ॥५॥
नामा ह्मणे ऐसी दैवाची नव्हाळी । न करितां झाली देवपूजा ॥६॥

२०.
लक्षवरी बिल्वदळें माथा वाहे । आनंद न समाये महादेवा ॥१॥
बहुता काळाचें तेथें एक लिंग । होतें भूमिभाग होऊ-नियां ॥२॥
भोळा महादेव तेणें संतोषला । ह्मणे करी मला कोण पूजा ॥३॥
नामा ह्मणे पाहे निमित्याची वाट । पुराणीं बोभाट असे त्याचा ॥४॥

२१.
पुराणीं पवाडे जयाचे अपार । ऐकतांचि फार सुख वाटे ॥१॥
भोळा महादेव पाहे भोंळा भाव । एकसरें जीव उद्ध-राया ॥२॥
रावण मागों गेला पार्वतीकारणें । देते वेळे नेणे कैसें द्यावें ॥३॥
जातीची चांडाळी गोकर्णासी गेली । दरुशनें ते नेली कैलासासी ॥४॥
नामा म्हणे कैसें दैव या भिल्लाचें । आलें पूज-नाचें फल हातां ॥५॥

२२.
माथां पडतां पालां । सांब तेणें संतोषला ॥१॥
होता प्राचिनाचा ठेवा । बहु दुर्लभ मानवा ॥२॥
काय भक्तीचा जीव्हा-ळा । काय त्याचे अंगीं कळा ॥३॥
बहु केलीं दुष्ट कर्म । सेखीं तोचि झाला धर्म ॥४॥
नामा ह्मणे भोळादेव । सांगायाचा हाचि भाव ॥५॥

२३.
इतुकियासाठीं । बहु तुष्टला धुर्जटी ॥१॥
काय सांगावा विचार । दैव पारध्याचें थोर ॥२॥
झाली तीन प्रहर निशी । पूजा पावली देवासी ॥३॥
धाडियेलें यमाला । सुखी कराया तयाला ॥४॥
आला तो धांवत । माग ह्मणे अपेक्षीत ॥५॥
त्याची विषयक भक्ति । पुढती झाली तया गती ॥६॥
जें जें याचकें मागावें । तें तें दातयानें द्यावें ॥७॥
काय मागितलें तेणें । तेंचि नामा ऐका म्हणे ॥८॥

२४.
येऊनियां यम ठाकला पुढारीं । पाहे दुराचारी दुरो-नियां ॥१॥
घाबरला मनीं कोण असे नेणे । विचारितां मनीं भां-बावला ॥२॥
पुसों लागे त्याला कोण तूं आलासी । आणिक ह्मणसी माग कांहीं ॥३॥
देव किंवा यक्ष राक्षस किन्नर । करितां निर्धार न पडे ठायीं ॥४॥
नामा ह्मणे मूर्ख पारधी तो खरा । दैव त्याच्या घरा आलें जाण ॥५॥

२५.
जाणोनियां यम संतोषला मनीं । मंजुळ वचनीं काय बोले ॥१॥
केली देवें कृपा पाठविलें मज । वरदान तुज द्यावयासी ॥२॥
सर्वही जीवाचा नियंता मी यम । इच्छिसी तो काम पूर्ण करूं ॥३॥
शिवरात्री आजी उपवास केला । शंकर तोशला बिल्वदळीं ॥४॥
नामा ह्मणे ऐसें ऐकतां वचन । पार-ध्याचें मन सुखावलें ॥५॥

२६.
जोडोनियां हात वंदिला कृतांत । ह्मणे माझा हेत इतुकाची ॥१॥
सर्वसुखाहूनि हेंचि वाटे गोड । संसाराची ओढ मोडवेना ॥२॥
मृग पक्षीयाचें कळावें बोलणें । सर्व कांहीं येणें कार्यसिद्धी ॥३॥
इतुकी आहे हो माझी ही वासना । पुरवूनि स्वस्था – ना जावें तुम्ही ॥४॥
नामा ह्मणे ज्याची जे कांहीं वासना । तेचि पुढें जाणा उभी ठाके ॥५॥

२७.
देऊनियां वर दंडपाणी गेला । ध्यास पारध्याला मृगा-चाची ॥१॥
लाऊनियां चित्त ऐके चळवळ । दृष्टीची तळमळ लक्ष तेथें ॥२॥
उगवला दीन जाहला प्रकश । मृग पक्षीयास दृष्टि झाली ॥३॥
तोचि मृग पाहा आला उदकासी । उडाण गगनासी साधीतसे ॥४॥
तृषाकांत मोठा चालीला नि:संग । प्रारब्धाचा भोग ओढवला ॥५॥
उदकाचिये हांवें दृष्टि झाली दुरी । पाश तो समोरी देखेचिना ॥६॥
येऊनियां पडे जाळिया माझारी । लोळे पृ-थ्वीवरी एकसरा ॥७॥
नामा ह्मणे भिल्लें पाहातां लोचनीं । वोढो-नियां गुणीं बाण लावी ॥८॥

२८.
घाव घालूं जातां देखिलें नवल । पाहातसे खळ दुष्ठ-भावें ॥१॥
परी तें होणार कदापि चुकेना । तैसीच वासना धांव घाली ॥२॥
धाकुटी हरणी पाडसें धाकुटीं । सांडी उठाउठी आली तेथें ॥३॥
पाहों जातां पाशीं गुंतला तो मृग । तेव्हां काय मग केलें तिनें ॥४॥
मुखाप्रती मुख लाऊनि चुंबिलें । ह्लदय फुटलें देख-तांचि ॥५॥
सुख दु:ख बोल बोलती ते वेळें । म्हणती कपाळीं भोग होता ॥६॥
सोडविता कोणी न दिसे ये काळीं । काळाची पडली उडी आतां ॥७॥
नामा ह्मणे खळा कळे त्याची वाणी । ऐकाया लागूनि स्थिर झाला ॥८॥

२९.
धर्मशास्त्री ऐसें बोलताती बोलें । तेणें चोजवलें चित्त त्याचें ॥१॥
आश्चर्याच्या डोहीं बुडाला पारधी । म्हणे कैसी बुद्धि याची पहा ॥२॥
रानींचीं रानवटें तया एवढें ज्ञान । प्रेमाचें जीवन वोसंडत ॥३॥
चाकाटली वृत्ति चित्त केलें स्थिर । दोघांचीं उत्तरें ऐकतसे ॥४॥
नामा ह्मणे हरणीहरणाचा संवाद । ऐकतां भवबंध तुटतसे ॥५॥

३०.
बंधनीं गुंतला देखोनियां पती । उडालीसे वृत्ति हर-णीची ॥१॥
देहाची ते आस सांडोनि लवलाही । पडे रडे कांहीं बोल बोले ॥२॥
ह्मणे तुह्मी आतां नव जावें एकलें । संगें आह्मां नेलें पाहिजे जी ॥३॥
बहुता जन्मांची तुह्मां आम्हां गांठी । आतां कैसी तुटी पाडितसां ॥४॥
भोम जे भोगिले स्वप्रप्राय झाली । नाहीं ते पुरली वासना हे ॥५॥
नामा ह्मणे विषयवासना वोंगळा । तेणें कोण्या काळें सुटिजेना ॥६॥

३१.
देखतांचि कांता दु:खी झाली फार । डोंगर तिजवर कोसळला ॥१॥
बोलतां तियेशी न निघती बोल । ऐसाची तो वेळ अवधारी ॥२॥
नको आतां पडूं मायेचिये भरी । जाये वो सुंदरी स्वस्थळासी ॥३॥
माझी गति मज तुझी गति तुज । काय काज व्यर्थ प्राण द्यावा ॥४॥
घरीं तुझीं बाळें गोजिरें गोमटीं । जाऊनियां पोटीं धरीं त्यांसीं ॥५॥
न लावी उशीर जाई वो माघारी । जंव तो दुराचारी न देखतां ॥६॥
बाळा पाळण हाचि स्त्रियांचा धर्म । सां-गतसे वर्म जाई आतां ॥।७॥
माझिया प्रारब्धीं होतें तैसें झालें । तूं कां येथें बळें प्राण देसी ॥८॥
नामा ह्मणे ऐसें सांगे तिच्या हिता । प्री ते नाइकतां कष्टी होय ॥९॥

३२.
नेत्रीं अश्रुधारा पडती अपार । तेणें पृथ्वीवर पूर ताहे ॥१॥
ह्मणे तुह्यांवीण कैसा प्राण धरूं । वांचुनियां करूं काय आतां ॥२॥
माझिया भारानें दाटेल मेदिनी । तुह्मां आव्हेरूनि गेल्यें जरी ॥३॥
सुखाचे सांगाती होतों दोघीजाणी । दु:ख ह्मणवूनि सांडी केली ॥४॥
सांडिलिया तुह्मां देवा न मानेल । वेदशास्त्र बोल हाकारिती ॥५॥
तुजविण क्षण कंथवेना काळ । मीना जैसें जळ तैसेम आह्मा ॥६॥
तुज-विण जिणें व्यर्थ या संसारीं । नामा ह्मणे खरी गोष्ट बोले ॥७॥

३३.
चण्डभिल्ल तेणें ऐकिलें बोलणें । सावधान मनें करो-नियां ॥१॥
तेव्हां होती चित्तीं वासना जे खोटी । जिरऊनि पोटीं चाकाटला ॥२॥
भीतिल यालागीं वृक्षा आड आला । ऐकों जो लागला शब्द त्यांचे ॥३॥
नामा ह्मणे ऐसा राहिला पारधी । ऐकावें ते संधि काय झालें ॥४॥

३४.
दुसरी जे होती गर्भिण कुरंगी । तेही लागवेगीं आली तेथें ॥१॥
आहा ऐसें काय केलें वो साजणी । नयेसी अझुनी कोंपटासी ॥२॥
लहान पाडसें आक्रंदती भुकें । कैसी येथें सुखें राहिलिसी ॥३॥
जाईं लवलाही त्यांसी स्तन देईं । सांगूं आतां कांहीं बोलवेना ॥४॥
नामा ह्मणे धन्य तयाचें सौजन्य । नाही भावभिन्न कोणामाजी ॥५॥

३५.
येरी म्हणे काय करूं वो सुंदरी । आतां आहे धरीं काय माझें ॥१॥
प्राणनाथें पेणें केलें स्वर्गलोकां । जाईन मी देखा तयासयें ॥२॥
वडिलपणें तुह्मी लोभ असों द्यावा । सांभाळ करावा बाळकांचा ॥३॥
वागुरे माझारी गुंतलासे कांत । कायसें जीवित विचारी पां ॥४॥
न लावीं उशीर जाईं येच क्षणीं । अससी गर्भिणी पूर्ण दिवस ॥५॥
जरी देसी प्राण पतन गर्भासी । होय ते दोषासी पात्र होसी ॥६॥
पोसोनियां बाळें वाढवीं वंशाला । द्यावें चित्त बोला माझ्या आतां ॥७॥
पळावया तुज नाहीं अंगीं बळ । न देखतां खळ जाईं वेगीं ॥८॥
नामा ह्मणे ऐसीं उत्तरें ऐकिलीं । तेही घाबरली तयेवळे ॥९॥

३६.
ऐकतांचि जीव झाला कासावीस । ह्मणे झालें कैसें अकस्मात ॥१॥
आहां कपाळींचा भोग वोढवला । कांत तो नि-घाला सांडोनियां ॥२॥
कैंची बाळें कोण कोणाची सांगाती । पाहातां हे भ्रांति वाउगीची ॥३॥
ठायींची हे काया जायाची जाईल । वांचलिया फोल पतिविण ॥४॥
पतीविण सुख काय या संसारी । दु:ख कल्पवरी भोगावें कीं ॥५॥
नामा ह्मणे ऐसें चिंतोनियां मनीं । आली ती तत्क्षणीं हरणापाशीं ॥६॥

३७.
कपाळीं कपाळ लावी चुंबी रडे । आक्रंदोनी पडे पृथ्वीवरी ॥१॥
आवडीचें चिन्ह सांगवेना वाचे । जाणावें जयांचें त्यांचें त्यांनी ॥२॥
मानेवरी मान टाकूनि राहिली । वाचाही खुं-टली बोलवेना ॥३॥
आह्मी तुजविण नें राहूं क्षणभरी । उदास न करीं चित्त आतां ॥४॥
नामा ह्मणे मृगजन्म त्यांचा खरा । लक्षितां विचारा ज्ञानी बहू ॥५॥

३८.
पट्टाची मी राणी वडील मानाची । जे गति मृगाची तेचि मज ॥१॥
जाईन सांगातें न सोडीं संगती । निश्चय हा चित्तीं दृढ केला ॥२॥
तुझीं बाळें घरीं कष्टती क्षुधेनें । जाईं वेगीं स्तनें पान देईं ॥३॥
बाळांकडे जाईं पाहें कंठीं काळ । न करीं उतावीळ मन आतां ॥४॥
नामा ह्मणे ऐसें संवादले फार । तिघांचें अंतर एकविध ॥५॥

३९.
ऐशा दोधीजणा एकविधं भावें । द्यायवासी जीव उभ्या ठेल्या ॥१॥
धन्य धन्य त्यांचा संसार सुफळ । सत्वाचेंचि बळ अंगामध्यें ॥२॥
पाजूनियां येईं बाळक्रासी स्तन । आम्ही दोघे जण येथें असों ॥३॥
न टाका मजला सांगोनि निघाली । बिर्‍हाडासी आली लागवेगें ॥४॥
घेऊनियां अंकीं पाडसें तीं दोन्ही । लावू-नियां स्तनीं शोक करी ॥५॥
एकमेकें सुखें राहावें अनन्य । तुटलें सौजन्य तुह्मां आह्मां ॥६॥
पति पडिलासे फांसीं सांडीतसे प्राण । आह्मांलागीं जाणें त्याच्यासंगें ॥७॥
ह्लदयीं धरोनी दिधलें चुंबन । तीं ह्मणती कोण पोशी आह्मां ॥८॥
येऊं तुह्मांसंगें देऊं आधीं प्राण । पुढील कारण तुह्मी पाहा ॥९॥
नामा म्हणे ऐसें पांचही ते एक । देखोनि कौतुक वाटतसे ॥१०॥

४०.
निघोनियां दखो आली त्या तटाका । झाली एकमेकां मेटी तेथें ॥१॥
परस्परें दु:ख देखतां वाढलें । धैर्याचेंचि बळ केलें त्यांनीं ॥२॥
देहभाव कांहीं नाठवे तयांसी । गुंतोनी मोहासी जीव देती ॥३॥
नामा ह्मणे देवें सोडवावें त्यांसी । हें तो अने-कांसी आटोपेना ॥४॥

४१.
पारधी तो झड घालोनी पातला । घालावया घाला एकसरें ॥१॥
भयाभीत झालीं पांचही ते काळीं । वासना गुंतली एकमेकां ॥२॥
वडील कुरंगी येऊनि त्यापाशीं । लागोनी पायांसी काय बोले ॥३॥
नको मारूं पति तृषेनें पीडिला । मारी तूं मजला तया आधीं ॥४॥
आहेवपणानें धाडी स्वर्गलोका । येतुल्यानें सुखा पात्र होऊं ॥५॥
इतुकीयामाजी दुसरीही आली । ती ह्मणे उगली थांब आतां ॥६॥
तृषेनें पीदिलों पाजीं आधीं पाणी । मन जैसें मनीं तैसें करीं ॥७॥
नामा ह्मणे भिल्ल विसरला घात । राहिला निवांत त्यांच्या बोलें ॥८॥

४२.
वडील कुरंगी काय बोले त्यासी । सांगतें धर्मासी पूर्वीलीया ॥१॥
बांधोनी मारितां घडे महादोष । पाजी उदकास सोडोनियां ॥२॥
पुऊनियां जळ येऊं तुजपाशीं । मग सावकासी करीं काज ॥३॥
आमुचा विश्वस नाहीं तुज जरी । मागशीं त्यापरी भाक देऊं ॥४॥
पर उपकारीं पडतसे देह । लोभ आतां काय वांचूनियां ॥५॥
भुकेलिया अन्न तान्हेल्या जीवन । पुण्यासी कारण इतुकेंची ॥६॥
पांचजणीं तुज बोपीयेले देह । यालागीं संदेह न धरावा ॥७॥
नामा ह्मणे ऐसा प्रार्थितां किरात । द्रवला मनांत काय बोले ॥८॥

४३.
होऊनियां तुह्मी वनींचीं वनचरें । बोलतसां फार धर्मा-धर्म ॥१॥
येणें कांहीं कांहीं द्रव आला मना । तुमची भावना कोण जाणे ॥२॥
सोडिल्या पाण्यासी ठकवूनि आम्हासी । गेलिया तु-ह्मांसी काय कीजे ॥३॥
नामा ह्मणे ऐसें बोलेनि किरात । करावया घात शस्त्र काढी ॥४॥

४४.
देखती तीं दोन्ही पाडसें त्या काळीं । भिल्लापुढें आली लागवेगें ॥१॥
सांभाळोनि हात ऐकावी विनंती । धरीं कृपा चित्तीं आमुचिया ॥२॥
अतितालागोनि चिलिया वोपी देहे । तेणेंचि तो लाहे परमधाम ॥३॥
मातापितरांसी न करावा घात । मारावें आमुतें आधी आतां ॥४॥
कोंवळें शरीर गोड बहु मांस । लागो सार्थ-कास तुझे कांजी ॥५॥
नामा म्हणे सत्त्व मोठें त्या पांचांचें । होती कैलासींचे अधिकारी ॥६॥

४५.
हरणी सांगे कांहीं कर्मविपाकासी । ऐशा ऐशा दोषीं ऐसे होती ॥१॥
ठकवूनियां आह्मीं तुज जाऊं जरी । अंधतमाभि-तरीं वास पावों ॥२॥
गुरु स्वामी द्रोही विश्वासघातकी । तयास तो नरकीं वास सदा ॥३॥
परद्रोही परनिंदेसी रतला । तो होय कावळा जन्मोजन्मीं ॥४॥
पंक्तिभेदकेचीं मरतील पोरें । किंवा पती मरे बाळपणीं ॥५॥
सदासर्वकाळ दुष्ट कमीं रत । शूकरादि होत नीच योनी ॥६॥
अतीत अभ्यागत पूजा नाहीं ज्याला । घूस सर्प बिळामाजी होती ॥७॥
नामा ह्मणे केलें तैसें तें भोगावें । सावधान व्हावें जाणत्यांनीं ॥८॥

४६.
पापिष्टाचें जिणें काय ते जिवालें । गळां स्तन झाले शेळियेचे ॥१॥
येथेंचि जो खोटा तेथें तो करंटा । व्यर्थ आला पोटा माउलीचा ॥२॥
तप्त ताम्र भूमि लोळविती नरा । लेटिती अघोर नरकामाजी ॥३॥
लोहोचंबुकाग टोंचिती येवोनी । मारि-ताती घणीं माथां घाव ॥४॥
वांधोनियां गळां टांगिती उफराटें । ह्मणताती सोटे वंरिच्यावरी ॥५॥
आसीपत्रावरी वोढिसी धरोनी । लेटिती नेउनी कुंभपाकी ॥६॥
जळतिया खाबा भेटविती बळें । खैरा़च्या इंगळें नाहाचिती ॥७॥
प्रळय क्रूर सर्प झोंबचिती कंठासीं । ओढोनि जिव्हेसी खंड करिती ॥८॥
नामा ह्मणे ऐसी पापिष्ठाची गती । जन्म लक्ष शतीं हेंचि फळ ॥९॥

४७.
न करू आह्मीं तैसें घेईं आतां भाक । अंतरीं नि:शंक झालो सर्व ॥१॥
तुह्मीं आह्मां साक्षी असे सदाशीव । येथें दुजा भाव धरूं नको ॥२॥
पिऊनियां पाणी न येऊं तुजपाशीं । तरी घडे आह्मांसी सर्व पापें ॥३॥
जातीचा ब्राह्मण न करी ब्रम्हकर्म । तो जैसा अधम तैसे आह्मी ॥४॥
स्वामिद्रोही आणि विश्वास-घातकी । तो पडे ज्या नरकीं तेथें पडो ॥५॥
नामा म्हणे ऐसी वाहोनियां आण । धरीले चरण पारध्याचे ॥६॥

४८.
पारधियासी तेव्हां दाटला गहींवर । लोटलें अपार प्रेम तेव्हां ॥१॥
जीवदान दिल्हें जावें तुम्हीं आता । न करावी चिंता कांहीं येथें ॥२॥
इंद्राचा मी दूत चुकलों सेवेसी । यालागीं जन्मासी आलों जाणा ॥३॥
तुमचिया बोलें निवालें अंतर । घात इत:पर न करीं कांही ॥४॥
नामा ह्मणे शुभकाळ त्याचा आला । ह्मणवोनि झाला पश्चात्ताप ॥५॥

४९.
सोडोनियां गळा मुक्त केले त्यांसी । पिऊनि उदकासी आली पुढती ॥१॥
क्षुधेलासी फार न लावीं उशीर । घेऊनिय़ां शस्त्र हाणी वेगें ॥२॥
घर तुझें दूर वाहावेना भार । आह्मी तेथ-वर येत असों ॥३॥
सत्यत्व देखोनि ह्मणतसे पारधी । तुम्ह्यांसी न वधीं जावें आतां ॥४॥
पाठोपाठी त्याच्या घरालागीं आली । वरणीं घातली मिठी त्यांनीं ॥५॥
नामा ह्मणे सत्त्व आगळें तयांचें । वर्णावया वाचे नये शेषा ॥६॥

५०.
हरिश्चंद्र राजा सत्त्वनिष्ठ मोठा । स्त्रीपुत्र चोहोटामाजी विकी ॥१॥
तैसोंचि येथें मृगाअंगीं सत्त्व । वोपियेला जीव पारध्यासी ॥२॥
शिबीराजा अंग कापी नेटपाटें । सत्त्वासी पालट होऊं नेदी ॥३॥
ताम्रध्वजा शिरीं कर्वत घातला । नाहीं पालटला मनोधर्मा ॥४॥
नामा ह्मणे मागें बहुतीं केएले कीर्ति । तयां ऐसी रीति येथें दिसे ॥५॥

५१.
आधींच कृपाळू भोळा महादेव । जाणितला भाव कुरंगांचा ॥१॥
कृपा केली देवें मांडिला सन्मान । धाडिलें विमान दूताहातीं ॥२॥
लखलखित टके पताका डोलती । तयामाजी होती गीत नृत्य ॥३॥
नाना सुमनांची शय्या आरुवर । करिती उपचार सिद्धि आड ॥४॥
आले अकस्मात तयाचियेपाशीं । पाहतां सर्वांसी नवल वाटे ॥५॥
दिव्य दएह झाले पांचांचे ते काळीं । विमानीं बैसली लागवेगें ॥६॥
पारधी देखोनी तटस्थ राहिला । दूतीं तया केला उपदेश ॥७॥
शिवरात्री आजी जागरण उपवास । केला तेणें दोष सर्व गेला ॥८॥
करोनी पारणें होईं शिवभक्त । आशापाशीं चित्त गोवूं नको ॥९॥
अखंड कीर्तन शिवनामाचें करीं । तेणें मोक्षपुरी पावसील ॥१०॥
पुढिल्या शिवरात्री नेऊं कैलासासी । सांगोनियां त्यासी गेले वेगीं ॥११॥
नामा ह्मणे मोक्ष झाला त्या पांचासी । वस्ति चंद्रापाशीं केली त्यांनीं ॥१२॥

५२.
तेणें उपदेशें पारध्यासी ज्ञान । करी तो कीर्तन नाम-घोषें ॥१॥
संचिताचा नाश क्रियमाण बुडविलें । त्या सहज जोडलें मोक्ष सुख ॥२॥
दुसर्‍या शिवरात्री पूजिलें शंकरा । करोनियां बरा भाव शुद्ध ॥३॥
विमानीं वाहोनी स्वस्थानीं स्थापिला । येथूनि संपला कथाभाग ॥४॥
नामा ह्मणे शिव विष्णु एकरूप । जाणो-नियां जप करा त्यांचा ॥५॥

५३.
शिवरात्री कथा धन्य जे ऐकती । इच्छिलें पावती सर्व कांहीं ॥१॥
पातकाचा नाश पुण्य वाढे फार । शेखीं विश्वंभर कृपा करी ॥२॥
भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान । काल करी चरण सेवा त्यांची ॥३॥
नामा म्हणे शिव अक्षरें हीं दोन्हीं । जपावीं सज्जनीं वारंवार ॥४॥

५४.
नामाचा महिमा कोण जाणे सीमा । चतुर्मुख ब्रह्मा-नेणे कांहीं ॥१॥
संसारा आलिया हेचि आहे जोडी । अखंड घ्यावी गोडी हरिनामें ॥२॥
सहस्त्रमुखें शेष वाखाणितां कीर्ती । नाहीं तया तृप्ति आजीवरी ॥३॥
पशु पक्षी तृण कीटक अपार । नामें गेले पार उतरोनि ॥४॥
कापुराचे राशी पडे अग्निकण । तैसें नाम जाण पातकासी ॥५॥
नामाग्नीनें दोष जळती एकसरा । कैवल्य जे धरा बसल्या ठायीं ॥६॥
नामा म्हने धन्य नामाचा प्रताप । ध्याती एकरूप देवभक्त ॥७॥

५५.
लिंगपुरानीं हा बोलिला इतिहास । तोचि म्यां तु-म्हांस निवेदिला ॥१॥
अनेक पुराणीं अनेक प्रकार । ताराक्या नर नारी लोक ॥२॥
मुख्य हेचि कथा शिवरात्रीची जाणा । कैलासीं चा राणी तोष पावे ॥३॥
नामा म्हणे मन करोनि निश्चळ । करा गदा-रोळ नामघोष ॥४॥

संत नामदेव गाथा शिवरात्रमाहात्म्य अभंग १ ते ५५ समाप्त

“संत नामदेव गाथा” शिवरात्रमाहात्म्य अभंग १ ते ५५ समाप्त

“संत नामदेव गाथा शिवरात्रमाहात्म्य” अभंग १ ते ५५ समाप्त

संत नामदेव गाथा शिवरात्रमाहात्म्य अभंग १ ते ५५ । समाप्त संत नामदेव गाथा शिवरात्रमाहात्म्य अभंग १ ते ५५ समाप्त । संत नामदेव गाथा शिवरात्रमाहात्म्य अभंग १ ते ५५ समाप्त । समाप्त संत नामदेव गाथा शिवरात्रमाहात्म्य अभंग १ ते ५५ समाप्त समाप्त संत नामदेव गाथा शिवरात्रमाहात्म्य अभंग १ ते ५५ समाप्त


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral