वरी भगवा झाला नामे।
अंतरीं वश्य केला कामें ॥१॥
त्याला म्हणूं नये साधू।
जगी विटंबना बाधू॥२॥
आपआपणा शोधून घ्यावें।
विवेक नांदे त्याच्या सर्वे ॥३॥
आशा दंभ अवघे आवरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
माऊली आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.