उर्णाचिया गळां बांधली दोरी – संत मुक्ताबाई अभंग

उर्णाचिया गळां बांधली दोरी – संत मुक्ताबाई अभंग


उर्णाचिया गळां बांधली दोरी ।
पाहो जाय घरीं तंव तंतु नाहीं ॥ १ ॥
तैसें झालें बाई जंव एकतत्त्व नाहीं ।
दुजी जंव साई तंव हें अंध ॥ २ ॥
ऐसी मी हो अंध जात होतें वायां ।
प्रकृति सावया पावली तेथें ॥ ३ ॥
मुक्ताई सावध करी निवृत्तिराज ।
हरिप्रेमें उमज एकतत्त्वें ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.