सुखसागरी वास झाला – संत मुक्ताबाई अभंग
सुखसागरी वास झाला ।
उंच नीच काय त्याला॥१॥
अहो आपण जैसे व्हावें।
देवें तैसेंचि करावें ॥२॥
ऐसा नटनाटय खेळ।
स्थिर नाही एकवेळ ॥३॥
एकापासुनी अनेक झाले।
त्यासी पाहिजे सांभाळिले ॥४॥
शून्य साक्षित्वें समजावें ।
वेद ओंकाराच्या नावें ॥५॥
एकें उंचपण केले।
एक अभिमानें गेलें ॥६॥
इतकें टाकुनी शांती धरा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥७॥
माऊली आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.