सुखसागर आपण व्हावें – संत मुक्ताबाई अभंग
सुखसागर आपण व्हावें ।
जग बोधें निववावें ॥१॥
बोधा करुं नये अंतर ।
साधू नाहिं आपपर ॥२॥
जीव जीवासी पैं दयावा ।
मग करूं नये हेवा ॥३॥
तरणोपाय चित्तीं धरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
माऊली आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.
होय माहिती नाही आम्हाला