शांति क्षमा वसे देहीं देव पैसे ।
चित्त समरसें मुक्त मेळु ॥ १ ॥
निर्गुणें उपरमु देव पुरुषोत्तमु ।
प्रकृति संगमु चेतनेचा ॥ २ ॥
सज्ञानीं दिवटा अज्ञानी तो पैठा ।
निवृत्तीच्या तटा नेतु भक्ता ॥ ३ ॥
मुक्ताई दिवस अवघा ह्रषीकेश ।
केशवेंविण वास शून्य पैसे ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.