sant muktabai gatha

सर्वी सर्व सुख अहं तेचि दुःख – संत मुक्ताबाई अभंग

सर्वी सर्व सुख अहं तेचि दुःख – संत मुक्ताबाई अभंग


सर्वी सर्व सुख अहं तेचि दुःख ।
मोहममता विष त्यजीयेलें ॥ १ ॥
साधक बाधक करूनि विवेक ।
मति मार्ग तर्क शोधियेला ॥ २ ॥
सर्वतीर्थ हरि दुभाळु धनुवो ।
वोळला कणवा चातकाचा ॥ ३ ॥
सूक्ष्ममार्ग त्याचा भक्त देहीं मायेचा ।
आकळावयाचा सत्व धरीं ॥ ४ ॥
वेद जंव वाणी श्रुति तुपें काहाणी ।
ऐको जाय कर्णीं तंव परता जाय ॥ ५ ॥
मुक्ताई सोहंभावें भरले दिसे देवें ।
मूर्तामूर्त सोहंभावे हरि घोटी ॥ ६ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *