संत जेणें व्हावें – संत मुक्ताबाई अभंग
संत जेणें व्हावें ।
जग बोलणे साहावें ॥१॥
तरीच अंगी थोरपण।
जया नाही अभिमान ॥२॥
थोरपण जेथे वसें ।
तेथे भूतदया असें ॥३॥
रागें भरावे कवणाशी।
आपण ब्रम्ह सर्वेदेशी ॥४॥
ऐशी समदृष्टी करा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥
माऊली आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.